जळगाव ( प्रतिनिधी ) – घरातील सांडपाण्याच्या वादात जुनी जोशी कॉलनीत ४२ वर्षीय व्यक्तीला चार जणांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीष जोशी (वय-४२ , रा. जुनी जोशी कॉलनी ) हे पत्नी मिनाक्षी यांच्यासह वास्तव्याला आहेत . एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी दुपारी गिरीष जोशी यांच्या घराचे सांडपाणी शेजारी राहणारे उमेश लागवे यांच्या अंगणात आले होते. याचा राग उमेश लागवे याला आल्याने त्याने लोखंडी रॉड घेवून गिरीष जोशी यांच्या डोक्यात हाणला. यात ते गंभीर जखमी झाले तर तुषार लागवे, मिनाबाई लागवे आणि बेबीबाई लागवे यांनी गिरीष जोशी यांची पत्नी मिनाक्षी यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. गिरीष जोशी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिली. जोशी यांच्या तक्रारीवरून उमेश लागवे, तुषार लागवे, मिनाबाई लागवे आणि बेबीबाई लागवे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना सुनिल सोनार करीत आहेत .







