सामनेर ता. पाचोरा (प्रतिनिधी) – येथील कृषिकन्यांनी भेट देऊन ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना कृषी विषयावर मार्गदर्शन व शेतीविषयक माहिती देण्यात आली.
दोंडाईचा येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालवातील विद्यार्थिनी माधुरी साळुंखे यांनी सामनेर ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांचा अडचणीचा आढावा घेतला. याप्रसंगी सरपंच संगीता भिल, उपसरपंच बाळकृष्ण पाटील, सदस्य रवींद्र साळुंखे, महेंद्र साळुंखे, महेश पाटील, भालचंद्र चव्हाण, भोलेनाथ भिल, राजेंद्र साळुंखे वाय. आर. अडांगळे, चिंतामण बडगुजर सुरेश चव्हाण, प्रशांत साळुंखे बाळकृष्ण साळुंखे, शिवाजी चव्हाण, किशोर पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.