मुंबई (प्रतिनिधी ) – आर्यन खान ताब्यात घेतल्यनंतर आजपर्यंत नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करत आहेत. आता त्यांनी समीर वानखेडेंच्या राहणीमानावर प्रश्नचिन्ह लावले आहे .
समीर वानखेडेंनी चुकीच्या मार्गाने नोकरी मिळवली इथपासून ते फर्जीवाडा करणारे भ्रष्ट अधिकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सगळ्या आरोपांसोबतच त्यांनी आता आणखी एक आरोपवजा दावा केला आहे. नवाब मलिकांनी आता समीर वानखेडेंच्या कपड्यांवर आणि पेहरावावर देखील आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, समीर वानखेडे यांनी आजवर हजारो कोटी रुपये उकळले आहेत. समीर वानखेडे 70 हजारचे शर्ट वापरतो. रोज दोन लाखांचे बूट घालतो. याचं कारण स्पष्ट आहे की, समीर वानखडे यांनी आजवर हजारो कोटी उकळले आहेत.
त्यांचे सगळे कपडे, बुट पहा, टी शर्टची किंमत तीस हजारापासून सुरु होते. घड्याळ रोज बदलते. वीस लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतची घड्याळे त्यांच्याकडे आहेत. समीर वानखेडे सत्तर हजार रुपयांचे शर्ट वापरतात, एक लाखाची पँट वापरतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, असा सवाल देखील त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटलंय की, समीर वानखेडे हा मोदींपेक्षाही पुढचा निघाला. वानखेडे मोदींपेक्षा महाग कपडे वापरतात. यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढे त्यांनी म्हटलंय की, जेएनपिटीवर अफीम असलेली एक बोट 15 दिवसापासून उभी आहे, मात्र अजून का गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये? असा सवाल त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, आर्यन खान केसमध्ये 18 करोडचा सौदा झाला होता.
सॅम डिसोझा आता समोर आला आहे, त्याने काल तसे कबूल केले आहे की असा सौदा झाला आहे. हा सर्व फर्जीवाडा समीर वानखेडे करत होता. चित्रपटातील काही कलाकारांना गेल्यावेळी असेच चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये सारा अली खान, दीपिकाला चौकशीसाठी बोलावले होते. यातून पैसे उकळले जातात, असा दावा त्यांनी केला आहे.