जळगावात पुढील महिन्यात मेळावा
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील समस्त माळी समाज आणि ‘माळीबंधन’ तर्फे जळगाव शहरातील सरदार पटेल लेवा भवन येथे राज्यस्तरीय वर-वधू परिचय मेळावा दि. २ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. याकरिता वर-वधू सूचीचे काम अंतिम टप्प्यात असून दि. १५ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे ‘माळी बंधन’ तर्फे समस्त माळी समाजातील विवाहेच्छुक मुलांसाठी राज्यस्तरीय वर-वधू व पालक परिचय मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे. विवाहेच्छुक तरुणांनी, समाजबांधवांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला असून नोंदणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माळी समाजाची वर-वधू परिचय पुस्तिका हि पूर्ण राज्यात व देशातील काही भागातदेखील वितरित होत असते.
या सूचीप्रमाणे अनेक तरुण मुला-मुलींना आपला सुयोग्य जोडीदार निवडण्यास मदत होते. त्यासाठी सूचीच्या छपाईसाठी मजकूर संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या विवाहेच्छुक वर-वधू यांना सूचित नोंदणी करायची असेल त्यांनी तत्काळ व्हाट्स अपवर (७५८८८१३१६७) माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी ८२६१९८७१९३ येथे संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष जयंत इंगळे, पवन माळी, कृष्णा माळी यांनी केले आहे.