जळगाव (प्रतिनिधी) : येथील समस्त माळी समाज आणि ‘माळीबंधन’ तर्फे जळगाव शहरातील सरदार पटेल लेवा भवन येथे राज्यस्तरीय वर-वधू परिचय मेळावा दि. २ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सुमारे १ हजार समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे ‘माळी बंधन’ तर्फे समस्त माळी समाजातील विवाहेच्छुक मुलांसाठी राज्यस्तरीय वर-वधू व पालक परिचय मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे. विवाहेच्छुक तरुणांनी, समाजबांधवांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. माळी समाजाची वर-वधू परिचय पुस्तिका हि वितरित होणार आहे.
या मेळाव्यात अनेक तरुण मुला-मुलींना आपला सुयोग्य जोडीदार निवडण्यास मदत होते. त्यासाठी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (७५८८८१३१६७, ८२६१९८७१९३) येथे संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष जयंत इंगळे, पवन माळी, कृष्णा माळी यांनी केले आहे.