• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुरुपीठाच्या आदेशाने श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखोंचा गैरव्यवहार, पोलिसांचे असहकार्य !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
गुरुपीठाच्या आदेशाने श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखोंचा गैरव्यवहार, पोलिसांचे असहकार्य !

जळगावातील प्रतापनगर येथील घटना

पत्रकार परिषदेत सेवेकरी सभासदांनी दिली माहिती

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील प्रतापनगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या काही सभासदांनी बेकायदेशीरपणे त्र्यंबकेश्वराच्या गुरुपीठाच्या आदेशाने लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. एका स्वतंत्र संस्थेच्या मालकीचे पैसे बेकायदेशीरपणे घेऊन जाणे, त्याचा कुठलाही हिशेब न दाखविणे हा केंद्रावर गुरुपीठाने टाकलेला दरोडाच आहे. याबाबत धर्मदाय आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनही सहकार्य मिळत नाही, असा गंभीर आरोप श्री स्वामी समर्थच्या सेवेकऱ्यांनी बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषदेत केला आहे.

नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील, प्रवीण चौधरी, संदीप व्यास, दिनकर देशमुख, बाळू पाटील आदी सेवेकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली आहे. जळगाव शहरातील प्रतापनगर येथील केंद्राच्या ट्रस्टचे सदस्य भरतसिंग मोहनसिंग पाटील राजपूत हे स्वयंघोषित अध्यक्ष तर रमेश बाबुराव परदेशी हे स्वयंघोषित उपाध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करीत आहेत. या केंद्रातील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या गैरव्यवहाराविषयी धर्मदाय आयुक्तांकडे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रार देण्यात आली होती. मात्र या तक्रारीबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ४ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना रीतसर लेखी तक्रार देण्यात आली. मात्र त्यांनी उलट तक्रारी प्रश्नांचा भडीमार करून सकारात्मकता दर्शविली नाही. असाच अनुभव पोलीस अधीक्षक कार्यालयातदेखील आला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचेदेखील या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही लक्ष वेधून घेऊ इच्छित आहे.

दानपत्रातून पैसे काढताना त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठातील सेवेकऱ्यांचा व्हिडिओ पहा…

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/12/WhatsApp-Video-2023-12-13-at-16.48.17.mp4

धार्मिक बाबांच्या दरबारात अनेक राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील तसेच सरकारी अधिकारी हजेरी लावत असतात. त्याचमुळे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आला असावा अशी मनात शंका येत असून त्याचमुळे पोलीस असहकार्य करीत आहेत का, असाही आरोप केंद्राच्या सभासदांनी केला आहे. दिंडोरी प्रणित श्री गुरुपीठ संस्था, त्र्यंबकेश्वरने प्रतापनगर केंद्राकडून आर्थिक स्वार्थाने हेतुपुरस्कर संगनमत केले आहे. प्रतापनगर केंद्रातील स्वयंघोषित लोकांनी दरवर्षी काही रक्कम गुरुपीठाला बेकायदेशीररीत्या दिलेली आहे.

दर हप्त्याला त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ संस्थेचे वाहन येते व दानपेटीतील पैसे एका थैलीत बेकायदेशीरपणे भरून घेऊन जातात. दानपेटीत किती पैसे होते, याचा हिशेब कुठल्याही सेवेकऱ्याला मिळत नाही. एका स्वतंत्र संस्थेच्या मालकीचा पैसा बेकायदेशीरपणे घेऊन जाणे हा शुद्ध केंद्रावर टाकलेला दरोडाच आहे. याशिवाय क्युआर कोड, पावती पुस्तकाद्वारेदेखील गुरुपीठाच्या सेवेकऱ्यांनी अवैधपणे पैसे स्वीकारले आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील आदींनी केला आहे.

कोणी, किती रक्कम स्वीकारले ?

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गणेश कॉलनी येथील शाखेत संस्थेचे खाते आहे. त्या खात्यात तत्कालीन अध्यक्षांनी मुलगा व सेवेकऱ्यांना हाताशी घेऊन बेकायदा रक्कम काढली आहे. यात स्वयंघोषित अध्यक्ष भरतसिंग पाटील राजपूत यांनी १० लाख ८८ हजार ७२२, त्यांचा मुलगा विरेंद्र भरतसिंग पाटील याने ९ लाख ८७ हजार, तर श्री गुरुपीठाकडून २२ हजार ५०० रुपये परस्पर काढून २३ लाखापेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे. हे पैसे त्यांनी चेकद्वारे काढले असून यामध्ये भरतसिंग पाटील यांनी ६ लाख खात्यात वर्ग करून घेतले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/samarth-kendrat-gairvyevhar/
Previous Post

दुचाकी चोरट्याला चोप, भरबाजारातून चोरीचा केला प्रयत्न !

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्याअधिष्ठातापदी डॉ.प्रशांत सोळंके

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्याअधिष्ठातापदी डॉ.प्रशांत सोळंके

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्याअधिष्ठातापदी डॉ.प्रशांत सोळंके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon