चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एमआयडीसीतील भारत वायररोप कंपनीच्या बंद गोदामातून साहित्य चोरणार्या त्रिकूटाला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शिवाजी कुर्हाडे (२०, आनंदवाडी, चाळीसगाव, ह.मु.कृष्णापुरी, पाचोरा), सोमनाथ महादू गायकवाड (३४, कृष्णापुरी, पाचोरा) व सागर बापू जाधव (२०, जुवार्डी, ता.भडगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. प्रिन्सकुमार श्रीराम नरेश गुप्ता (सेक्टर नं.४, एमआयडीसी, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, भारत वायररोप कंपनीच्या बंद गोदामातून चोरट्यांनी ४५ हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक वायरचे पाच बंडल तसेच ७५० रुपये किंमतीचे पीपीकोर वायरचे एक बंडल चोरट्यांनी लांबवले. शह पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे संशयितांना अटक करीत त्यांच्याकडून ४५ हजार ७५० रुपयांचा चोरलेला मुद्देमाल जप्त केला.
कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश बेलदार, राहुल सोनवणे, भूषण पाटील, दीपक पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, आशितोष सोनवणे, रवींद्र बच्छे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.