राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) – सध्या शरद पवारांसोबतच असून काही बोलणार नाही. “वेट अँड वॉच” अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे यांची भूमिका पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
राजभवनात रविवारी २ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी सातव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर त्यांच्यासह ९ जनांनीदेखील शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
अजून तरी काही नाही. सध्या शरद पवारांसोबत आहे. तीन दिवसांनी भेटूया, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली आहे.