• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सचोटीने केले कर्तव्य : ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’ पोलीस कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सचोटीने केले कर्तव्य : ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’ पोलीस कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार

भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) : कर्तव्याप्रति सचोटी व प्रामाणिकपणा जोपासत पोलीस दलाचे नाव अधिकाधिक उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या भुसावळ विभागातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’ पुरस्काराने भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी नुकताच सन्मान केला. भुसावळ पोलीस प्रशासनातर्फे दर महिन्याला येथील बाजारपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, शहर वाहतूक पोलीस ठाणे आणि नशिराबाद पोलीस ठाण्यातील प्रत्येक एका कर्मचाऱ्यास गौरवण्यात येते.

दर महिन्याला पोलीस कर्मचाऱ्यांना क्राईम मीटिंगमध्ये गौरवण्यात येते. भुसावळ डीवायएसपी कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये आयोजित केलेल्या क्राईम मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांना देण्यात येऊन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व बुके देऊन सन्मान केला, तर गौरवप्राप्त कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजाराचा रिवॉर्ड मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला. कायद्याचे ज्ञान अद्ययावत होण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अव्वल आलेल्या भुसावळ तालुक्याचे हवालदार संजय तायडे, भुसावळ तालुक्याच्या महिला हवालदार लीना लोखंडे, भुसावळ तालुक्याचे हवालदार कैलास बाविस्कर, भुसावळ बाजारपेठचे कॉन्स्टेबल हर्षल महाजन, बाजारपेठचे कॉन्स्टेबल सागर वंजारी, बाजारपेठ हवालदार अतुल पवार यांचादेखील या वेळी गौरव करण्यात आला.

भुसावळ शहर ठाण्याचे कॉन्स्टेबल मेहुल मनोजकुमार शहा यांनी केसेस सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली तसेच दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. भुसावळ बाजारपेठचे नाईक विनोद नारायण डोळे यांनी अॅम्बीश प्रणालीत अटकेतील १३३ पैकी १२४ आरोपींची, तर २०२५ मध्ये १८ आरोपींची नोंद केली. भुसावळ तालुक्याचे ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक संजय वासुदेव कंखरे यांनी तपासावरील गुन्ह्यांची निर्गती केली तसेच मुलींसंदर्भातील दोन गुन्हे उघड केले. नशिराबादचे कॉन्स्टेबल सागर श्रावण बिडे यांनी समन्स व वॉरंटची अंमलबजावणी करीत रेकॉर्ड अद्ययावत केले. तसेच शहर वाहतूक शाखेचे साहाय्यक फौजदार सलीम नबी शेख यांनी एमव्ही अॅक्टच्या सहा केसेस तर लोकअदालतीच्या अनुषंगाने बीएनएस २८५ प्रमाणे ३५ केसेस केल्या. म्हणून मेहुल शहा, संजय कंखरे, सागर बिडे, सलीम शेख यांचा गौरव करण्यात आला. या वेळी भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, शहरचे निरीक्षक उद्धव डमाळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड, नशिराबादचे सहायक निरीक्षक आसाराम मनोरे, सहायक निरीक्षक राहुल भंडारे तसेच ६० अंमलदार उपस्थित होते.


 

 

Tags: सचोटीने केले कर्तव्य : 'एम्प्लॉई ऑफ द मंथ' पोलीस कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार
Previous Post

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, भुसावळचा तरुण जागीच ठार

Next Post

बसस्टँडमध्ये “नाथजल” जादा दराने विकणाऱ्या विक्रेत्याला दंड, आगार व्यवस्थापकांचा दणका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्टँडमध्ये “नाथजल” जादा दराने विकणाऱ्या विक्रेत्याला दंड, आगार व्यवस्थापकांचा दणका

बसस्टँडमध्ये "नाथजल" जादा दराने विकणाऱ्या विक्रेत्याला दंड, आगार व्यवस्थापकांचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon