जळगाव ( प्रतिनिधी ) ;- मोदी सरकारला अपयशाचे सात वर्षे पूर्ण झाले असून देशाला ज्या डबघाईत टाकले असल्याच्या निषेधार्थ आज दुपारी काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कार्यकर्ते यांच्याकडून घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले .

संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकार मधील मोदी सरकारच्या निषेधार्थ ७ कारणांचा उल्लेख निवेदनात केला आहे. यात कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश, लसी करण्यात आलेले अपयश , पेट्रोलचे डिझेलचे भाव आणि वाढती महागाई , , देशाची ढासळती अर्थव्यवस्था नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेले देशाची दुर्दशा १२ कोटी लोक बेरोजगार, 5 शेतकरी विरोधी कायदे , आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नामुष्की
मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला रेल्वे विमानतळ बंदरे बीएसएनएल पेट्रोलियम कंपन्या अशा सरकारी अस्थापना विकायला काढल्या आदी कारणांचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला .
यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज चौधरी, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे , जनरल सेक्रेटरी जमील शेख ,प्रदेश प्रतिनिधी न्यानेश्वर कोळी, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद घुगे, भिकन सोनवणे ,समाधान पाटील, श्याम तायडे ,प्रदीप सोनवणे ,जगदीश गाडे, दीपक सोनवणे, देवेंद्र मराठे, पी. जी. पाटील, गोकुळ चव्हाण ,राहुल गरुड, वैभव पाटील, सचिन माळी, ज्ञानेश्वर पाटील ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.







