सीईओ मीनल करनवाल यांचे कडक निर्देश
या बैठकीदरम्यान प्रमुख आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर करनवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागांतील नागरिकांपर्यंत दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा पोहोचवणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यात कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश व सूचना
• आदिवासी भागांसाठी कृती आराखडा तयार करणे: विशेषतः गर्भवती व बाळंत महिलांसाठी प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश.
• औषध वाटप योजना मजबूत करणे: आवश्यक औषधे वेळेवर व नियमितपणे वितरीत होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
• रुग्णवाहिकेची सेवा सुधारण्यावर भर: प्रत्येक रुग्णवाहिकेत जीपीएस ट्रॅकर बसवण्याचे आदेश दिले, जेणेकरून तिचे मूव्हमेंट ट्रॅक करता येईल व आपत्कालीन प्रसंगी वेळेवर पोहोचता येईल.
• आरोग्य कर्मचाऱ्यांना जबाबदारीने वागण्याचा आग्रह: सेवाभाव, तत्परता व शिस्तबद्धता ही आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख ठरली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीस लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांच्यासह अनेक वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमताने यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी एकजूटीनं आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आश्वासन दिले.