जळगाव;- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, रावेर, बोदवड क्षेत्रातील नागरिकांना आता डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील एनएबीएल मानांकित लॅबमधून शासनाच्या आदेशानुसार आरटीपीसीआर टेस्ट करता येणार असून अवघ्या २४ तासात रिपोर्ट देण्यात येणार आहे, यासंदर्भात आरटीपीसीआर नमुना तपासणीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलला पत्र दिले आहे.
डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलमध्ये आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी अद्यावत अशी एनएबीएल (छअइङ) मानांकित मॉलेक्युलर डायग्नोस्टीक लॅबोरेटरी प्रस्थापित करण्यात आली आहे. २४ तासात रिपोर्ट प्राप्त होवून आयसीएमआर पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. डॉ.उल्हास पाटील आरटीपीसीआर लॅबमार्फत कोविड-१९ रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी या कार्यालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकार्यांकडून परवानगी मिळाली आहे. तरी आता भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, रावेर, बोदवड या क्षेत्रातील कोविड १९ रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिले आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोविड-१९ संदर्भात कुठलेली लक्षणे जाणवली असल्यास वेळ न वाया घालवता ताबडतोब डॉ.उल्हास पाटील आरटीपीसीआर लॅबमध्ये येवून आपला स्वॅब द्यावा आणि लॅब आपणास २४ तासातच रिपोर्ट देणार आहे, सद्यस्थीतीला दर दिवसाला ३५० ते ४०० कोविड स्वॅब तपासले जात असून खात्रीशीर रिपोर्ट दिला जात आहे. याकरीता अत्याधुनिक मशिनरी तसेच प्रशिक्षीत कुशल तंत्रज्ञांची टिम २४ तास कार्यरत असून सेवा बजावत आहे.








