चाळीसगाव ;- काल आमदार मंगेश चव्हाण यांनी कॉन्फरन्स कॉलवर पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
हा कॉल चालू असताना वलठाण येथील पोलीस पाटील हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, वलठाण येथे डेंग्यू ची साथ आली असून काही तरुण डेंग्यू झाल्यामुळे समर्थ हॉस्पिटल येथे ऍडमिट आहेत. त्यावर आमदार चव्हाण यांनी तुम्ही कुठे आहात अशी विचारणा केली तेव्हा मी चाळीसगाव मधेच असल्याचे सांगितले. आमदार चव्हाण यांनी त्यांना तात्काळ कार्यालयात या कॉल संपताच आपण दवाखान्यात जाऊ अस सांगितले. कॉन्फरन्स कॉल संपल्यानंतर आमदार मंगेश दादा चव्हाण यानी संबंधित रुग्णांची विचारपूस साठी पोलीस पाटील हरिषचंद्र चव्हाण यांच्यासह समर्थ हॉस्पिटल गाठत रुग्णांची भेट घेतली त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली व डॉ राहुलदेव वाघ यांची भेट घेत अधिक माहिती जाणून घेतली.