शिरसोली जवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे काही अंतरावर कामायनी एक्स्प्रेस अप या रेल्वे गाडीला अपघात झाल्याची चर्चा दुपारी रंगली . मात्र रेल्वेची आपातकालीन यंत्रणा किती दक्ष व तयार आहे याची चाचपणी करण्यासाठी हि रंगीत तालीम घेण्यात आली. या वेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे गाडी नं. ०१०७२ वाराणसी ते लोकमान्य टिळक जाणारी कामायनी एक्सप्रेस अपमध्ये शिरसोली येथून काहीच अंतरावर असलेल्या दहा पुल, कुऱ्हाडदा शिवार येथे सदर रेल्वे गाडीमधून मोरकेनिंग टेस्ट करण्यात आली. सदर टेस्ट ही अधिकारी वर्ग हा किती वेळात पोहचू शकतो, या कारणाने केली जाते. सदर गाडी ही किमान १ ते. १:३० तास जागेवर स्थिर होती. ही रंगीत तालीम खांब क्रमांक ४०३/ २६ येथे घडून आली.