अमळनेर (प्रतिनिधी) –दि. 15 ऑगस्ट 2021 रविवारी स्वातंत्र्यता दिनाच्या दिवशी घ्वजारोहण पि.बी.ए. ईग्लीश मेडीयम स्कूल व न्यायालयाच्या प्रांगणात सकाळी ठिक 7.15 वाजता पार पडले. कार्यक्रमाला सर्व रोटरीसभासद राष्ट्रीय गणवेशात हजर होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर अमळनेर न्यायालयाच्या आवारात रोटरी क्लब कडुन रोपे ,संरक्षण पिंजरे लावण्यात आले. सदर वृक्षारोपण अमळनेर न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर.जोशी, न्यायाधीश गायधनी, न्यायाधीश कराडे , न्यायाधीश सुषमा अग्रवाल मॅडम, अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष अँड. राकेश पाटील, सेक्रेटरी जयेश पाटील, तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. किशोर बागुल, शशिकांत पाटील, आर बी चौधरी ,तिलोत्तमा पाटील व वकील संघटनेचे सर्व सभासदांन सोबत रोटरी अध्यक्ष रो.वृषभ पारेख, रो.दिलीप भावसार, रो. रमेश जीवनानी, रो.पुनम कोचर,रो. मकसूद बोहरी, रो.आशिष चौधरी, रो. अभिजीत भांडारकर, रो.प्रशांत निकम, रो.महेश पाटील, रो.प्रितपालसिंग बग्गा रो.राजेश जैन, रो.किर्ती कोठारी, रो.अहमदी बोहरी, रो.भूपेंद्र जैन, रो.ताहा बुकवाला व रोटेरीयन यांच्या हस्ते लावण्यात आले. हा कार्यक्रम शासनाच्या सोशल डिसेन्सींगचे पालन करून करण्यात आला.








