पाचोरा ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी पाचोरा पोलीस ठाण्याचे पो नि नजन पाटील यांना निवेदन देताना माजी आमदार दिलीप वाघ , राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, तालुका अध्यक्ष विकास पाटील,राष्ट्रवादी शहर प्रमुख अझहर खान, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, नाना देवरे, डॉ पी एन पाटील, रणजित पाटील , नगरसेवक अशोक मोरे, सुचेता वाघ, नीलिमा पाटील , बशीर बागवान, महिला तालुकाध्यक्षा रेखा देवरे, सुनीता देवरे, वैशाली बोरकर, जयश्री मिस्तरी, सुरेखा पाटील, प्रमिला वाघ, श्रध्दा गायकवाड, दत्ताभाऊ बोरसे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजीत पवार, पिंटू भामरे, हारून देशमुख, सुदाम वाघ, प्रकाश पाटील, किशोर डोंगरे, सुदर्शन सोनवणे, ए बी अहिरे , भोला चौधरी, डी एस आप्पा, जनार्धन पाटील, दिनेश पाटील, नितीन माने, भगवान मिस्तरी, सत्तार पिंजारी, राहुल राठोड, गौरव वाघ , गौरव शिरसाठ, किशोर डोंगरे, गणेश पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.