जळगाव;– लॉकडाऊनमध्ये बेकायदेशीररीत्या दुकान उघडून यातून मद्याची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरके वाईनच्या दोघांना याप्रकरणात अटक झाली होती . या वाईन शॉपमध्ये उपलब्ध साठ्यापेक्षा कमी साठा आढळून आल्याने आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आरके वाईन्सचा परवाना रद्द केल्याचे आदेश काढले आहेत .
याबाबत वृत्त असे की, सध्या लॉकडाऊन सुरू असून मद्याची दुकाने देखील पूर्णपणे बंद आहेत. तथापि, काही व्यावसायिक अन्य दुकाने बंद असल्याचा लाभ उचलून चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याचे दिसून आले होते. या अनुषंगाने १२ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अजिंठा चौफुली येथे असणार्या आर. के. वाईन्स या दुकानावर छापा मारला. यात उपलब्ध असणार्या साठ्यापेक्षा खूप कमी साठा आढळून आला. यामुळे संबंधीत दुकानदाराने लॉकडाऊनच्या कालावधीत संबंधीत दुकानदाराने मद्यविक्री केल्याचे निष्पन्न झाले होते. या अनुषंगाने दुकानदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आज जिल्हाधिकार्यांनी राजकुमार शीतलदास नोतवानी, सुधा राजकुमार नोतवानी व सौ दिशान दिनेश नोतवानी यांच्या नावाने असणारा आर. के. वाईन्सचा परवाना रद्द करत असल्याचे आदेश आज काढले आहे.