जळगाव ( प्रतिनिधी ) – माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्तां शिवजनगरातील घरकुलाचा बेकायदा वापर करीत असल्याचा आरोप आज रिपाइं ( आठवले गट ) ने केला . रिपाइं ( आठवले गट ) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घरकुले महापालिकेने ताब्यात घेऊन अन्य गरजूना देण्याची मागणी केली आहे .
आज पत्रपरिषदेत रिपाइं ( आठवले गट ) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी सांगितले की , शिवाजीनगर , हुडको , घरकुल क्रमांक ३८८ हा दीपककुमार गुप्ता यांचा घराचा पत्ता आहे . तेथे त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे . महापालिकेकडून हे घर अशोक सुकदेव थोरात यांना मिळाले आहे . शिवाजीनगर , हुडको , घरकुल क्रमांक ३७६ हा दीपककुमार गुप्ता यांचा कार्यालयाचा पत्ता आहे . महापालिकेकडून हे घर मनोज पांडुरंग पुंड यांना मिळाले आहे . महापालिकेच्या अटी आणि शर्तींचा भंग करून या दोन्ही सदनिकांचा बेकायदा वापर दीपककुमार गुप्ता करीत आहेत . या दोन्ही सदनिकांचा थकलेला मालमत्ता कर दीपककुमार गुप्ता यांच्याकडून वसूल करण्यात यावा . या दोन्ही सदनिका दीपककुमार गुप्ता यांच्या ताब्यातून महापालिकेने काढून घ्याव्या आणि अन्य गरजूंना द्याव्यात . दीपककुमार गुप्ता यांच्यासह अशोक सुकदेव थोरात व मनोज पांडुरंग पुंड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी . महापालिकेकडून ही घरे देताना लाभार्थ्याने हे घर किरायाने देऊ नये , गहाण ठेऊ नये , आदी अटी घातलेल्या असतात त्यामुळे महापालिकेने या तिघांवरही कारवाई करावी , असेही ते म्हणाले.