शहर पोलिसांची कामगिरी, बेंडाळे चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.१५ जुलै रोजी रिक्षाचालकाला लुटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी एका फरार आरोपीला अटक केली आहे. त्याला पुढील तपासकमी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहरातील जोशी कॉलनीत राहणारे रिक्षा चालक निलेश उर्फ रायबा शांताराम जोशी यांना दि.१५ जुलै रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास चौघांनी बेंडाळे चौकाजवळ गल्लीत लुटले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी उपनिरीक्षक प्रिया दातीर यांच्या पथकाने गुन्ह्यातील तिघांना अटक केली होती. तर एक संशयित अद्याप फरार होता.
शहर पोलिसांना एक संशयित आरोपी रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये दारू पित असल्याची शनिवारी दुपारी माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, योगेश बोरसे, तेजस मराठे, अमोल ठाकूर यांच्या पथकाने समीर खान माजीद खान (वय-३२ रा. गेंदालाल मील,जळगाव) याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांना पाहून संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला शिताफीने केली. पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.