धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील घटना
धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बांभोरी येथील एका रिक्षा चालकाला जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी शिवीगाळ करत लाकडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा दिलीप सपकाळे (वय ४२, रा. बांभोरी ता. धरणगाव) हे परिवारासह वास्तव्याला असून रिक्षा चालवून ते उतरनिर्वाह करतात. दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जुन्या भांडण्याच्या कारणावरून गावात राहणारे राजेंद्र श्यामराव सपकाळे, किशोर राजेंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे आणि प्रमोद रामदास नन्नवरे या चौघांनी सावली वाईन शॉप जवळ शिवीगाळ करून लाठीकाठीने त्यांच्या हाताला पायाला आणि डोक्यावर मारून करून त्यांना दुखापत केले.
या संदर्भात शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण तांदळे हे करीत आहे.