बोदवड तालुक्यात जामनेर रस्त्यावर घडली घटना, कुटुंबीय जखमी
बोदवड (प्रतिनिधी) :- शहरामध्ये जामनेर रोड परिसरातील अरिहंत जिनिंगसमोर शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची ॲपे रिक्षा पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. येत एक जण ठार तर त्याच्या कुटुंबातील काही जण जखमी झाले आहेत. बोदवड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
योगेश ज्ञानदेव मंगळकर (वय २८, रा. नवेदाभाडी, ता. जामनेर) हे ॲपे रिक्षाने आपल्या परिवारासह नातेवाईकांसह शिरसाळा मारुती येथे दर्शनासाठी जात होते. यादरम्यान जामनेर रोडवर अरिहंत जिनिंगसमोर ही ॲपे रिक्षा (एमएच १९ बियु ४६०७) पलटी झाल्याने योगेश ज्ञानेश्वर मंगळकर गंभीर जखमी झाले. तर परिवारातील ४ ते ५ जण जखमी झाले. गंभीर योगेश याला जळगावला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे. तर परिवारातील उषाबाई ज्ञानदेव मंगळकर ( वय- ५० वर्ष,रा. नवेदाभाडी, ता. जामनेर), रामदास राजाराम गोरे (वय-९०, रा. जामठी, ता. बोदवड),धर्मेश गोरख बच्छाव (वय-३२,रा. संगमनेर),दिवाकर भास्कर नेवाड (वय-२१,नवेदाभाडी, ता. जामनेर), उज्ज्वला युवराज राऊत (वय-३५,रा.बऱ्हाणपूर) यांच्यावर बोदवड ग्रामीण रुग्णालयात डॉ. योगेश राणे,डॉ. यासिर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरु आहेत. घटनेची बोदवड पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.