रावेर;- कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादीतर्फे जीवनावश्यक वासूनचे वाटप करण्यात आले.
शहराध्यक्ष महेमुद शेख यांच्या सहकार्याने गरजूंना ५० किट्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार मनीष जैन यांनी अन्नधान्याचे वाटप केले. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मनिष जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉकडाऊन 0.2 मध्ये हातावर पोट असणा-यांच्या घरापर्यंत किराणा किट्स पोहचवीण्यात आले. किट्स बघुन अनेकांच्या चेह-यावर समाधान दिसून आले. यावेळी राष्ट्रवादीचे सोपान पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी , शहराध्यक्ष महेमुद शेख , मनोज वाघ , पंकज वाघ आदी उपस्थित होते.