भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात घटना
प्रशांत भक्तानी हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इलेक्ट्रिक विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. दिनांक २ रोजी सकाळी साधारणतः ७:१५ वाजता त्यांची बहीण नेहमीप्रमाणे त्यांना उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आला.