जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : गिरणा पंपींग रोडवरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेसमोर येवून एका प्रौढाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिपक सुपडू महाले (वय ४५ रा. जाणता राजा शाळा, कोल्हे हिल्स परिसर, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. जाणता राजा शाळा परिसरात दिपक महाले हे त्यांच्या पत्नी, दोन मुलं आणि विवाहित मुलगी यांच्यासह राहत होते. गुरूवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घरातील कौटुंबिक वादातून त्यांनी गिरणा पपींग रोड परिसरातील धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केली. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती. तर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आला.यावेळी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.