भुसावळ तालुक्यातील फुलगाव जवळची घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – दीपनगरकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीखाली आल्याने फुलगाव येथील पंकज रामचंद्र चौधरी (वय ४४) या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंकज रामचंद्र चौधरी हे काही कामानिमित्त सद्गुरू हॉलच्या पुढे जात असतांना दीपनगरकडे जाणाऱ्या रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाले. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंकजांच्या मृत्यूमुळे परिवारावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.