भुसावळ तालुक्यातील आचेगावजवळ घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – वरणगाव-आचेगाव दरम्यान रेल्वेलाइनवर ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, ४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. रेल्वे ट्रॅकमन सुभाष भीमराव बावस्कर (४३) यांना अज्ञात ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला. हा मृतदेह वरणगाव-बोदवड मार्गावरील रेल्वे डाउन खांबा नंबर ४६१ /२० ते २२ च्या दरम्यान ट्रॅकजवळ आढळला. मेमो स्टेशन प्रबंधक किशोर गडाख यांनी दिल्यानंतर सुभाष भीमराव बावस्कर यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कुठल्यातरी धावत्या गाडीतून पडत्याने वा गाडीखाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे हे करीत आहे. मयताच्या अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आहे. मयत तरुण हा आचेगाव रेल्वे लाइनजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडला असल्याचा संशय आहे. मयताची ओळख पटत असल्यास वरणगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.