भादली रेल्वे रुळाजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- भादली ते जळगाव अप रेल्वे लाईनवरील रेल्वेरूळावर सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एका तरूणाचा जखमीवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिपक सुकलाल सोनवणे (वय-२४,रा. पवन नगर, जळगाव) असे मयत तरूणाचं नाव आहे. दिपक सोनवणे हा तरूण आई, वडील भावासोबत जळगाव शहरातील कांचन नगरात वास्तव्याला आहे. सोमवारी पहाटे दिपक सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत रेल्वेवरील लोको पायलट रामेश्वर प्रसाद यांनी वॉकीटॉकीवरून शनीपेठ पोलीसांना कळविले. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांसह् घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनाम करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.
तरूणाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व मित्र परिवाराची मोठी गर्दी होती. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.