भुसावळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखवण्यात आली हिरवी झेंडी
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ विभागातील १४ आरपीएफ स्थानके आणि चौक्यांना गुन्हेगारांना जलदपणे पकडण्यासाठी बुलेट दुचाकी वाहनांचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आले यावेळी दाखवून दुचाकींचे लोकार्पण झाले.
वाटप झालेल्या दुचाकी ह्या मनमाड वर्कशॉप, चाळीसगाव, जळगाव, बडनेरा सेंट, बडनेरा वर्कशॉप, मूर्तिजापूर, भुसावळ लोको, भुसावळ राखीव, भुसावळ सेंट, नाशिक रोड, नाशिक टीएमडब्लु, मलकापूर, अकोला आणि खंडवा या ठिकाणी देण्यात आले आहेत. नवीन बुलेट मोटरसायकल प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त मुंबई मध्य रेल्वे अजय सदानी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ एस. एस. केडिया यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.
हा लोकार्पण विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे पार पडला.नवीन बुलेट मोटारसायकलींच्या वितरणामुळे, आरपीएफ पोलिस स्टेशन आणि चौक्यांवर तैनात अधिकारी आणि कर्मचारी लवकरात लवकर विभागातील गुन्हेगारी ठिकाणी पोहोचण्यास आणि गुन्हेगारांना पकडण्यात मदत करेल आणि RPF ची गतिशीलता सुधारेल, असा आशावाद अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.