जळगावच्या पिंप्राळा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : रेल्वे रुळावर चरत असलेल्या गायीला रेल्वेची धड़क बसून ती जागीच मृत्युमुखी पडली. ही घटना शनिवारी दिनांक १० ऑगस्टला दुपारी बजरंग बोगद्याजवळ घडली. या परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
राजमालतीनगर मधील एक जणाच्या मालकीची गाय बजरंग बोगद्यावरील रेल्वे रुळावर चरत होती. त्यावेळी एका धावत्या रेल्वेची या गायीला धडक लागली. त्यात ती बोगद्यावरून खाली पडली व जागीच मृत्युमुखी पडली. या विषयी महापालिका कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर ते तेथे आले. मात्र रेल्वेच्या धडकेने गायीची छिन्नविच्छिन्न अवस्था झाली होती. त्यामुळे जेसीबी आणून त्याद्वारे मृत गायीची विल्हेवाट लावण्यात आली.