जळगाव येथील रेल्वे आरपीएफच्या पथकाची कारवाई
जळगाव [प्रतिनिधी] – डमी आयडी कार्डचा वापर करून रेल्वे तिकिट विक्री करणारा एकाला आज शहरातील तेली चौक परिसरातून जळगाव आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजार करणारे भामटे समोर येणार आहे. आरपीएफच्या पथकाने आज रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्याला जळगावातून अटक केली आहे.
दरम्यान बोगस रेल्वे तिकीट विक्रीचा काळाबाजार करणार्या संशयिताला आज आरपीएफच्या पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. ही कारवाई आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील जुने जळगाव भागात असणार्या तेली चौकात करण्यात आली. यात संदीप प्रोव्हिजनचा संचालक पंकज आनंदा बारी या तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
एक व्हॅलीड आयडी असतांना दुसर्या डमी आयडी वापरून रेल्वे तिकीटांची अफरातफर करत असल्याची माहिती रेल्वे सायबर सेल ला मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी ही कारवाई केली असल्याची माहिती रेल्वे स्टेशन पोलीस निरीक्षक सी.एस.पटेल यांनी दिली. संशयित कडून कसून चौकशी सुरू असल्याने. याबाबत सविस्तर माहिती थोड्यात वेळात केसरीराज वर वाचा