जळगाव- इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेमार्फत हेल्थ केयर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर यांना साहित्य वाटप करण्यात आले. रेडक्रॉस संस्थेत सेवा देणारे सहकारी, शासकीय रूग्णालयामार्फत लसीकरण केंद्रात सेवा देणारे कर्मचारी, रेडक्रॉसचे स्वयंसेवक अशा एकूण 110 हेल्थ केयर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर यांना रेडक्रॉस इम्युनीटी फूड कीट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जमादार उपस्थित होते.
रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी गरजेनुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले. कोरोना काळात रक्ताची गरज व रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन केले. उपाध्यक्ष गनी मेमन यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि, रेडक्रॉस परिवाराच्या वतीने आम्ही सर्व हेल्थ केयर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर यांच्या कार्याला मानवंदना देऊ इच्छितो. आपल्या सर्वांच्या हातून घडत असलेली हि सेवा आपल्याला नक्कीच खूप आत्मिक समाधान देईल. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, डॉ. अपर्णा मकासरे, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले.