जळगाव (प्रतिनिधी) – येथील रायसोनी महाविद्यालयात ‘अपग्रॅ्ड’ कंपनी व रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयायाच्या संयुक्त विद्यमानाने बीसीए इन डेटा सायन्स व एआय अॅन्ड एमएल सर्टिफिकेट कोर्सचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपग्रॅ्ड कंपनीचे सहयोगी संचालक लोकेश माथुर व गौरव सिंग तसेच रायसोनी बिजनेस मॅनेजमेटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल उपस्थित होते. अपग्रॅ्डचे सहयोगी लोकेश माथुर यांनी बीसीए इन डेटा सायन्स या कोर्स विषयी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात या कोर्सेचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे व येणाऱ्या काळात या कोर्सचे वाढणारे महत्व याविषयी माहिती दिली. हा कोर्स ऑनलाइन व ऑफलाइन राहणार असून या कोर्सेसला जी मार्गदर्शक डेटा सायन्स या क्षेत्रात प्रात्याक्षिकपणे काम करतात तेच इंडस्ट्री एक्स्पर्ट या कोर्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. बीसीए इन डेटा सायन्स हा कोर्स बॅगलोर, मद्रास, लखनउ येथील आयआयटीमध्ये मॉड्यूल अपग्रेडद्वार शिकवण्यात येतो. तीन वर्षाचा हा कोर्स असून यात एकूण सात वैकल्पिक विषय राहणार आहेत तसेच या कोर्सचे सातशे तासांचे ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण दिले जाणार असून आठशे ते हजार असाइनमेट, सात ते आठ इंडस्ट्री प्रोजेक्ट घेतले जाणार आहे. या कोर्स मध्ये पायथाॅन, इबीए, स्टॅटेस्टीक मशीन लर्निग आदि मुद्याचा समावेश राहणार आहे व हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विविध कंपन्यामध्ये डाटा अॅनालिस्ट, डाटा सायन्सटिस्ट, बिग डाटा अॅनालिस्ट, कस्टमर अॅनालिस्ट, बिजनेस अॅनालिस्ट, रिसर्चर इन एआर अॅन्ड एमएल, डाटा अॅनालिटिक्स इंजिनियर, व्हीजुलायजेशन लीड या विविध पदांवर विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेटच्या संधी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व ‘अपग्रॅ्ड’ या दोन्ही संस्थाकडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीसीए इन डेटा सायन्स या विषयाचे २०२१ पर्यत मोठ्याप्रमाणात महत्व वाढणार असून विद्यार्थ्यांना या विषयाला जास्तीत जास्त संख्येने अॅडमिशन घ्यावे असे आवाहन रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. तेजल ओझा यांनी केले होते.
विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्माण करण्याच्या उद्धेशाने ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात एआय अॅन्ड एमएल सर्टिफिकेट कोर्सचेही उद्घाटन करण्यात आले. या कोर्ससला बारावी उत्तीर्ण विध्यार्थी प्रवेश घेवू शकणार असून एआय अॅन्ड एमएल सर्टिफिकेट कोर्सलाही आठ माॅड्यूल राहणार आहे या कोर्सेससाठीही आंतरराष्ट्रीय पातळीच्या संस्थासोबत करार करण्यात आले असून रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच महाविद्यालय या कोर्सेसचा समावेश करणारे महाविद्यालय ठरणार आहे.