नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अभिनेते आणि भाजपा खासदार ‘रवी किशन’ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली आहे. ‘मी कोणत्याही धमक्यांना भीत नाही, देशासाठी गोळ्या झेलण्यासही मी तयार आहे’. असं वक्तव्य रवी किशन यांनी काही दिवसांपूर्वी केलं होत.
दरम्यान, यांच्या या व्यक्तव्यानंतर रवी किशन यांना जीवानीशी मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. परिणामी त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे सरकारने त्यांना Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली. त्यानंतर खासदार रवी किशन यांनी ट्विट करत योगी सरकारचे आभार मानले आहे.
‘आदरणीय श्रद्धेय योगी आदित्यनाथ महाराज जी, माझ्या सुरक्षेखातर तुम्ही मला Y+ श्रेणीतील सुरक्षा दिलीत. यासाठी मी, माझे कुटुंबीय आणि लोकसभा क्षेत्र कायम तुमचे ऋणी राहू.’ अशा आशयाचं ट्विट करुन रवी किशन यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.







