सावदा पोलीस स्टेशनची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : केळी व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार संशयित आरोपीला हरियाणा येथून रावेर न्यायालयाच्या आदेशाने सावदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
सावदा येथील केळी व्यापारी रितेश संतोष पाटील (रा.सावदा) यांचेकडून २१ लाख रुपये किमतीची केळी माल विकत संशयित आरोपी जयप्रकाश नारायण गुप्ता (रा. कुंडली बॉर्डर, हरियाणा) याने घेऊन त्याचे मोबदल्यात पैसे परत न करता चेक दिला होता. सदरचा चेक हा बँकेत दाखल केल्यावर चेक बाउन्स झाला होता. याप्रकरणी तक्रारदार यांनी रावेर न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने पकड वॊरंट काढले होते.
सदर प्रकरणातील आरोपीस सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सहाय्यक फौजदार बशीर तडवी व पोलीस हवलदार सिकंदर तडवी असे पथक तयार करून हरियाणा येथे पाठविले. सदर पथकाने जयप्रकाश गुप्ता याचा शोध काढून त्यास शिताफीने अटक केली. हरियाणा येथून सावदा पोलिस स्टेशनला आणून संशयिताला रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली.