खिर्डी येथील पाटील विद्यालयात स्नेहमेळावा
रावेर (प्रतिनिधी) :- येथील दि रूरल एज्युकेशन सोसायटी संचलित अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व ह. ल. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सन १९९८/९९ च्या दहावी बॅचची मुलं-मुली ही तब्बल २७ वर्षांनी एकत्र येण्याचा योग जुळून आला. या वेळी मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवर्णीना उजाळा दिला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सुरवातीला माजी शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी माजी मयत शिक्षक व मयत विद्यार्थी, शहीद सैनिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे-मुंबई-नाशिक-सुरत-इंदूर आदी ठिकाणी अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी नोकरीसाठी बाहेर आहेत. धावपळीच्या जीवनात एकमेकांना भेटणे जमत नाही. त्यामुळे सर्वांनी व्हॉटसअॅपवरून एकमेकांना संपर्क केला. गेट्टुगेदर कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. उपस्थित शिक्षकांमधून एम. जे. पाटील, बी. एस. पाटील, पी. एस. चौधरी, एस. के. महाजन, संस्थेचे सचिव टी. एल. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमधून डॉ. नितीन हिवाळे, जयश्री जयस्वाल, प्रवीण धुंदले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती महाजन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी मुख्याध्यापक व शिक्षक टी. एल. पाटील, बी. एस. पाटील. एम. जे. पाटील. महाजन, पी. एस. चौधरी, ह चौधरी, जी. एम. असवार, जे. एन. पाटील, शिक्षिका बेंडाळे, टी. पी. धुंदले, शिक्षकेतर जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण धुंदले, अनिता महाजन यांनी केले, तर आभार हरलाल पाटील यांनी मानले.