रावेर ( प्रतिनिधी ) – शहरात बंद घरातून चोरट्यांनी ३० हजार रुपये चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदीना कॉलनीतील मोहोम्मद यूनुस शेख कलीम हे ६ डिसेंबररोजी बाहेर गेल्याने त्यांचे घर बंद होते. बंद घरावर नजर ठेवत अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले तीस हजार रुपये लंपास केले. रावेर पोलिस ठाण्यात मोहोम्मद यूनुस यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भादवी कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना महेंद्र सुरवाडे पुढील तपास करीत आहे.







