रावेर (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात परिविक्षाधीन असलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकारी वेवोतोलू केजो यांची रावेर येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे.
नागालँड राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या तथा नागपूर येथील डॉ. विश्वेशरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून स्थापत्यशास्त्र अभियांत्रिकीतून बी. टेक. ही पदवी सन २०२० मध्ये संपादन केलेल्या वेवो तोलू केझो यांनी रावरे पं. स. च्या गटविकास अधिकारी पदाच्या परिवीक्षाधीन सेवेचा २५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ केला आहे. सन २०२२ मध्ये ग्रामविकासाची प्रशासनिक जबाबदारी आहे. ती कर्तव्यनिष्ठतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहणार असून, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे केझो यांनी सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी ३८७ क्रमांकांचे यश संपादन केले आहे.