तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
रावेर (प्रतिनिधी) – यावर्षी मे, जून, जुलै महीन्यात सतत आसमानी व सुलतानी संकटांची मालिका शेतकर्यावर सुरूच आहे. पंचनाम्यांना उशिर होत राहील्याचा अनुभव आहे. याचे कारण म्हणजे कृषी विभागातील अपुर्ण मनुष्यबळ. वादळ, गारपिट, पुराचे पाणी, यावेळीच पंचनाम्यासाठी कृषी व महसूल यांच्या हस्ते सदरचे काम करण्यात येते. परंतू रावेर तालुक्यातील कृषी कार्यालयात तब्बल ४१ वेगवेगळी पदे रिक्त असल्याने तालुक्यातील ११७ गावांना मंजुर ६७ पदापैकी एक कृषी अधिकारी व २६ कर्मचारी या गावाचा गाडा सुरळीत ओढीत आहेत.
एकुण सहावेळा असमानी व सुलतानी संकट या भागात ओढावले. पंचनामे झालीत. काही भरपाई मिळाली. अजुन काहींची अपेक्षीत आहे. प्रत्येक वेळेस कृषी विभागातील कर्मचारी नसल्याने पंचनामे उशिराने होत आहेत .एप्रील महीन्याच्या अखेरीस २९ ला आणि मे च्या २९, ३०, ला तसेच जुनच्या ४ आणि ८ तारखेला वादाळासह गारांचा तडाखा तालुक्याला बसला होता. त्यावेळेस केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
मनुष्य बळाअभावी पंचनामे करण्याचे काम दिरंगाईने झालेहोते . येथे ६७ पदे मंजुर आहेत. कृषी सहाय्यक एकुण ३७ पदे भरलेली असून १३ रिक्त आहेत. सहाय्यक अधिक्षक पद भरले आहेत. लिपिकाची चार पैकी निम्मी पदे भरली असून अनुरेखकाची पाचही पदे रिक्त आहेत. वाहन चालक पदाची एक पद भरले असून एक पद रिक्त आहे तर शिपाई पदाची फक्त एकच पद भरलेले असून पाच पदे रिक्त आहेत. एकूण ६७ पदे भरलेली २६ भरलेली असून रिक्त ४१ अशी आहेत.म्हणून शासनाने कृषी कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत .