रावेर (प्रतिनिधी) – सर्वत्र अनलॉक होत असतांना राज्यातील देवस्थाने देखील खुली करावीत या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. यात पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन व पंचायत समिती सभापती जितू पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
रावेर भारतीय जनता पार्टी तर्फे महाविकास आघाडी सरकारच्या मंदीर बंदच्या विरोधात ओंकारेश्वर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलनात भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन पंचायत समिती सभापती जितु पाटील उपसभपती जुम्मा तडवी,योगिता वानखेडे सुनिल पाटील,तालुका सरचिटणीस प्रा सी. एस. पाटील, महेश चौधरी,अमोल पाटील विशाल पाटील महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. मात्र यावेळी तालुक्यात महत्वाचे पं स सदस्य जी प सदस्यानी उपोषणाला दांड्या मारल्या होत्या.