सावदा पोलिस स्टेशनची धडक कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खिरोदा येथे अवैध दारू विक्री दुकानावर दि. ४ रोजी सावदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे १२ हजार २३० रुपयाचा माल जप्त केला. तसेच संशयित आरोपी समीर लतीब तडवी रा. खिरोदा ता. रावेर यांना अटक करण्यात आली.
तसेच जानोरी येथे दुसरा छापा टाकण्यात आला. ठिकाणी गावठी दारू, गुलमोहर, कच्चे रसायन असा माल नष्ट केला. त्यात संशयित आरोपी मुकद्दर जुम्मा तडवी रा. जानोरी यांना अटक करून जामीनावर सोडण्यात आले. त्या ठिकाणी आरोपींवर सावदा पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या कलमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे नवीनच रुजू झाले आहेत. रुजू होताच त्यांनी कारवाया सुरू केल्या आहेत. कारवाई करणाऱ्या टीममध्ये सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, निलेश बाविस्कर, पो. ना. सुनील सैंदाणे या टीमने हि कारवाई केली.