रावेर पोलीस स्टेशनची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाल-खरगोन रस्त्यावर कत्तलीसाठी अवैधरित्या मुऱ्हा जातीच्या नर व मादीचे ४९ म्हशींचे पारडू ट्राला मध्ये कोंबुन नेत असतांना रावेर पोलीसांनी कारवाई करत वाहन जप्त केले आहे. तर याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
खरगोन कडून पाल येथील शेरी नाक्याजवळ शुक्रवारी दिनांक १९ जुलै रोजी मध्यरात्री नंतर टाटा कंपनीचा द्राला क्रमंक (आरजे ११ जीसी ५६९७) ला रावेर पोलीसांनी अडवून तपासणी केली. त्यात ४ लाख ९० हजार किंमतीच्या मुऱ्हा नर जातीचे २ ते ३ वर्षाचे म्हशीचे ४५ पारडू तसेच २ ते ३ वर्षाचे ४ मादि जातीचे म्हशीचे पारडू आढळून आले. या कंटेनरमध्ये त्यांना चारा पाण्याची सोय न करता वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय, दोरीने जखडून बांधून निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करतांना मिळून आले.
या प्रकरणी पोलीसांनी १५ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर जप्त केला. पोलीस कॉस्टेबल मुकेश मेढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून जमशेर ता.हतीन जि. पलवल (हरियाणा), इरफान ईस्राइल खान ( वय २५, रां. उमरा ता. फिरोजपुर जिल्हा गुडगाव (हरियाणा), रकीबखान सोराबखान,पचनाका (हरियाणा) यांन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोहेकॉ विष्णू भिल करीत आहेत .