जळगाव ( प्रतिनिधी ) – शहराचे ग्रामदैवत आणि अभिमान समजल्या जाणाऱ्या रामाच्या रथाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे . आबालवृद्धांच्या साक्षीने परंपरेने विधिवत पूजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली .
शहरात भिलपुरा मशीद येथे रामरथ पोहचताच भिलपुरा मशिदीचे मुख्य ट्रस्टी अयाज अली नियाज अली, सय्यद नाशिर अली, माजी उपमहापौर करीम सालार यांचे मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवानी राम रथावर व मिरवणुकीतील हिंदू बांधवावर पुष्प वर्षाव केला तेव्हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले . भिलपुरा मशिदीसमोरील हजरत पीर लालशाह बाबा दर्गा येथे दर्ग्यावर चादर चढविली गेली मुस्लिम पंच कमिटी , मस्जिद व दर्गाचे ट्रस्टी यांनी मिरवणुकीच्या संयोजकांचे स्वागत केले राम रथाच्या संयोजकांनीही मुस्लिम ट्रस्टी मंडळींचा सत्कार केला अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , पोलीस उपाधीक्षक कुमार चिंथा यांचाही मशिदीच्या ट्रस्टींनी सत्कार केला.