जळगाव (प्रतिनिधी) – दुध फेडरेशन जवळील रस्त्यावरून जातांना धान्याने भरलेली ट्रक खड्ड्यामुळे उलटून घरासमोर लावलेल्या कारवर पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला.
शहरात विविध भागात अमृत योजनेचे काम सुरु आहे. शिवाजीनगर परिसरातदेखील काम करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. या रस्त्यावरून माल ट्रक (क्र.एमएच १९ झेड ५७६३) धान्य भरून जात होती. ट्रक चालकाला रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ती ट्रक खड्ड्यामुळे उलटली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अपघातग्रस्त ट्रक थेट एका कारवर जावून पडली. यात कारच्या काचा फुटल्या या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार केली तरी ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.