जळगाव (प्रतिनिधी) :- बोहरा सेंट्रल स्कूल ता. पारोळा, येथे हिंदी विषय-विभाग प्रमुख शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.प्रदीपकुमार कळसकर यांना नुकताच “राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार-2024” पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोकल युनिव्हर्सिटी सहारनपूर (उ.प्र.) तर्फे दरवर्षी ऑल इंडिया एज्युकेशन कॉन्फरन्स आयोजित केली जाते ज्यामध्ये संपूर्ण भारतातील शिक्षक जे शैक्षणिक क्षेत्रात समर्पित आणि उत्कृष्ट कार्य करत आहेत ते एकत्र येतात व सर्व
विषय शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येतात. संपूर्ण भारतातून 2000 अर्ज प्राप्त झाले असुन त्यातून सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर, फक्त 300 उमेदवारांची निवळ करण्यात आली. त्यात सर्व मानके पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना “राष्ट्रीय शिक्षारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते.” या वर्षी, जळगाव जिल्ह्याचे डॉ.प्रदीपकुमार कळसकर यांना “राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार 2024” साठी निवळ करण्यात आले आहे.
प्रमुख अतिथि म्हणून योगगुरु पद्मश्री डॉ.भारत भूषण, उत्तर प्रदेश सरकार विशेष सचिव, परिवहन विभाग अखिलेश कुमार (आईएएस), सहारनपुर शहरातील काज़ी, काजी नदीम अख्तर, पद्मश्री डॉ.राजन सक्सेना, पद्मश्री सेठपाल सिंह सहित ग्लोकल विश्वविद्यालयाचे प्रतिकुलपति प्रोफेसर डॉ. एस. के. शर्मा, प्रतिकुलपति प्रोफेसर डॉ. पी. के. मिश्रा व कुलसचिव प्रोफेसर डॉ. एस.पी. पाण्डे, प्रतिकुलपति (आयुष) प्रोफेसर डॉ. जॉन फ़िनबे व प्रोफेसर डॉ. उमेश कुमार कार्यक्रमास उपस्थित होते.
डॉ.प्रदीपकुमार कळसकर हे ता.पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये गेल्या 10 वर्ष्यापासुन हिंदी विषय इयत्ता-9वी व 10वी विद्यार्ध्यांना शिक्षण देवून मुलांना एक चांगला माणूस घडवण्याचे काम ते सामाजिक बांधिलकी म्हणून ते करत आहेत. त्यांना नुकताच हैदरबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी मिळाली आहे व त्यानंतर त्यांचे शैक्षणिक कार्य पाहता त्यांना “राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार 2024” हा पुरस्कार देवून सम्मानित करण्यात येत आहे.
14 जुलै 2024 रोजी मिर्झापूर पोल येथील ग्लोकल युनिव्हर्सिटी सहारनपूर (उ.प्र.) येथे त्यांना हा सन्मान देण्यात आला.
ते कै.सौ. कुसुम व श्री. सुरेश बारसु कळसकर (सेवानिवृत्त-माध्यमिक शिक्षक, शिरसोली, जळगाव) यांचे सुपुत्र आहेत.