श्री राम कथेचे केले श्रवण
रावेर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी बोदवड तालुक्यातील श्रीक्षेत्र शिरसाळे येथे भेट दिली. “श्री हनुमान मंदिर ट्रस्ट” मार्फत “श्री हनुमान याग (पंचकुंडी यज्ञ)” निमित्त दर्शन घेतले.
प.पु.सतपंथरत्न १००८ महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून “श्री राम कथा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात श्रीराम पाटील यांनी उपस्थित राहून, कथेत आरती करून दर्शन घेतले. कथा श्रवण केली व उपस्थित भक्तांशी संवाद साधला. प्रसंगी बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.