जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने लोकसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतलेले कृषि विधेयक रद्द करावे तसेच हाथरस येथील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यलयावर शिंगाडा मोर्चा काढत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी कार्यालयापासून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा प्रभारी प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, हाजी गफ्फार मलिक, प्रमोद पाटील, रमेश पाटील, राजेश वानखेडे, मजहर पठाण, मो. शेख इरफान शेख कुतुबुद्दीन, शेख मेहमूद शेख हसन, देवेंद्र खेवलकर, पवनराजे पाटील, डॉ. प्रशांत पाटील, सुनील सचदेव, वाय . एस. महाजन आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.