जळगाव (प्रतिनिधी ) – आज त्रिमुर्ती मित्रमंडळ व एस.आर.कम्पुटर कुंसुंबा यांच्यावतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या उत्साहाने महिला स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवत पारंपारिक व पर्यावरण पुरक रांगोळ्या साकारल्या होत्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निर्मल अनिल पाटील व एस.आर.कम्पुटरच्या संचालिका शबनम शेख , ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे यांनी यानी यावेळी परीश्रम घेतले. तसेच त्रिमुर्ती मंडळाचे सर्व कार्यकर्ते परीसरातील नागरीक यावेळी उपस्थित होते.