जळगाव ( प्रतिनिधी ) – आम्ही नारायण राणेंसारख्यांना खपवतो , त्या दृष्टीने खासदार उन्मेष पाटील तर चिल्लर आहेत असा दणका देत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा त्यांच्या गिरणा परिक्रमेवर टीका केली आहे .
आपल्या गिरणा परिक्रमेला सुरुवात करताना खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती . पालकमंत्री नेहमी याच रस्त्याने जातात पण या भागातील अवैध वाळू उपसा बंद होत नाही असे ते म्हणाले होते त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की , हा अवैध वाळू उपसा काही आताच म्हणजे गुलाबराव पाटलांच्याच काळात सुरु झालाय असे नाही , त्यांना कल्पना आहे की मागच्या काळात जे वाळू माफिया होते त्यात चेतन शर्मा जे नाव होते ते जर आठवत असेल तर ते कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी आत्मसात करावे , मी असे म्हणणार नाही की वाळू व्यवसायात शिवसेनेचे लोक नाहीत या व्यवसायात सगळ्याच जातीचे , धर्माचे आणि सगळ्याच पक्षांचे लोक आहेत पण त्यांना गुलाबराव पाटील नावाचा एक रोग झालेला आहे . परिक्रमेचा अर्थ जर त्यांना शिकायचं असेल तर नदीच्या काठावर फिरावं लागत हे गाड्यांमधून फिरले आणि ज्या रस्त्यांवरून फिरले ते शेत रस्ते गुलाबराव पाटीलने तयार करीत आहेत . त्याच रस्त्यांवरू त्यांना जावं लागलं . ज्या मठापासून त्यांनी सुरुवात केली तेथे ८० लाख रुपयांचा हॉल गुलाबराव पाटीलने बनवला आहे माझे त्यांना आव्हान आहे की त्यांनी ही परिक्रमा करण्यापेक्षा अशी एक परिक्रमा करावी कि मी या गावामध्ये एक मुतारी तरी बांधली . तो एक रुपयाचे काम करीत नाही हे डोक्यावर घेऊन ७ वर्षांपासून फिरत आहेत २७ वर्षांपासून यांचा खासदार त्या मतदारसंघात आहे , यांची तिथे बोंब पडत नाही . परिक्रमा करण्याकरिता नदीच्या काठावर फिरावे , नदीच्या काठावर तर फिरलेच नाहीत . पण विनाकारण आता आपल्याकडून काहीच होत नाही आपण लोकांना खासदार फ़ंड देऊ शकत नाही शेत रस्ता देऊ शकत नाही मग काहीतरी स्टंट करावा म्हणून त्यांनी हे केलेलं आहे आणि दुसरं टार्गेट त्यांना कुठलंच नाहीय त्यांना या जिल्ह्यामध्ये कुणी हुंगत नाही . म्हणून ते गुलाबराव पाटील नावाचा जप करत आहेत मी त्यांना मागेही सांगितलय ; गुलाबराव पाटलांच्या नादी लागू नये आम्ही नारायण राणेंसारख्यांना खपवतो , त्या दृष्टीने खासदार उन्मेष पाटील तर चिल्लर आहेत , असेही ते म्हणाले.