जळगाव शहरातील रामपेठ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ भागात एका तरुणाने राहत्या घरी वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयेश मुरलीधर खडके (वय २७, रा. रामपेठ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमसीएचे शिक्षण घेऊन तो आता रोजगाराच्या शोधात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.(केसीएन)काही दिवसांपासून तो जॉब (रोजगार)च्या शोधात होता. मंगळवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास जयेश याच्या घरातील सदस्य खालील खोलीत होते. तर जयेश हा वरच्या मजल्यावरील खोलीत गेला होता. काही वेळाने कुटुंबीय वरच्या खोलीत गेले असता जयेश याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले.
यावेळी घाबरलेल्या कुटुंबियांनी जयेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे जुने जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.