रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे काल रात्री चार भावंडांची अत्यंत क्रूररित्या हत्या करण्यात आली. अत्यंत गरीब परिस्थितीत राहणाऱ्या या भावंडांची हत्या झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. खासदार रक्षाताई खडसे यांनी या ठिकाणी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व लवकरात लवकर या मारेकऱ्यांना पकडण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, फैजपूर उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पं.स.सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, प.स.सदस्य पी.के.महाजन, हरलाल कोळी, संदीप सावळे, अंकुश चौधरी, शुभम पाटील, वासुदेव नरवाडे, सुनील काटे, राहुल पाटील, किरण नेमाडे, कैलास पारधी,आसिफ पिंजारी, लखन पाटील, पंकज चौधरी, परमेश्वर सोनार आदी उपस्थित होते.